टॉप बातम्या

सालईपोड (खंडणी) येथे विज पडून शेतकऱ्याची बैलजोडी ठार

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील सालईपोड (खंडणी) येथील एका शेतकऱ्याची बैल जोडी विजेच्या धक्क्याने दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन खरीप हंगामाच्या कामाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्याची बैलजोडी ठार झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. 
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील सालईपोड (खंडणी) परिसरात दुपारी तीन वाजता च्या सुमारास माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र,वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट झाला आणि अशातच विज कोसळली, यात लक्ष्मण चंदकू टेकाम (53) या शेतकऱ्याची बैल जोडी गावालगत असलेल्या गोठ्यात जागीच ठार झाली आहे. हे बघताच बळीराजाने हंबरडा फोडला. बैलजोडी दगावल्याने शेती करायची कशी मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. 
त्यामुळे शेतकऱ्याचे लाखों चे नुकसान झाले असून, ऐन शेतीच्या हंगामात बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी प्रशासनाने मदत करावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे.
वृत्त लिहिपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी दाखल व्हायचे होते.



Previous Post Next Post