कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
नांदेड : संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान राबलेल जात असताना हिमायतनगर नगरपरिषदेकडून स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून कंत्राटदारांकडून स्वच्छतेचे काम बरोबर होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या व भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश मराठवाडा कार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांनी केला आहे. परिणामी ठेकेदाराचे कंत्राट परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा व प्रामाणिक जनहितार्थ काम करणाऱ्या कंत्राटदाराला परवाना देवून शहरवासियांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी साहेब यांना करण्यात आली आहे.
शहराच्या स्वच्छतेसाठी महिन्याला १५ ते १७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात येते, महिन्याला लाखों रुपयाचा निधी उपलब्ध होऊनही शहरात अस्वछता, घाण पसरल्याचे ठिकठिकाणी दिसून येतेय. मग निधी नेमका कुठे खर्च होतो असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठिकठिकाणी टेंडर मिळवण्यात यशस्वी झालेल्या टेरा मेरी कंपनीने फक्त निधी लाटला असून, काम कुठेही केली नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे. शहरात होणाऱ्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
शहरात घाणीने अक्षरशः कळस गाठला असून शहरवासियांकडून ठेकेदारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असल्याने प्रामाणिक कंत्राटदारांना ठेका देवून मर्जीच्या ठेकेदाराचा कंत्राट परवाना रद्द करण्यात यावा अशी जन आक्रोश संघटनेच्या वतीने सीमा स्वामी लोहरळकर यांनी केली.
निधी उचल करायचा आणि फक्त नाममात्र कामे करून मोकळे व्हायचं असा प्रकार पहावयास मिळत असून प्रशासकीय यंत्रणा मूग गिळून गप्प आहे.
जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी तात्काळ लक्ष घालून ठेकेदाराचा परवाना रद्द करावा अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश मराठवाडा कार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर, आशाताई जाधव, संगीता झिंगाडे यांनी केली. या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने आम्हाला पाऊल उचलावे लागेल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
हिमायतनगरमध्ये स्वच्छतेचा बोजवारा, प्रशासनाचे दुर्लक्ष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 16, 2022
Rating:
