किरायदाराने घरमालकाचा केला खून

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : तालुक्यातील राजुर (कॉलरी) येथे एका भाडेकरूने  आपल्या घरमालकाचा खून केल्याची घटना राजुर येथे आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
राजेश पोचय्या बोडकिलवार (वय अंदाजे 46) असे खुनात मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.
राकेश केवट हा राजेश बोडकिलवार याच्या घरी भाड्याने रहात होता, राकेश केवट व राजेश बोडकिलवार हे दोघे चांगले मित्र होते असे समजते. मागिल काही दिवसांपासून त्यांच्यात काही कारणावरुन वाद सुरु होता. या वादाचे रुपांतर आज खुनात झाले. असा कयास आहे. घरी झोपून असलेल्या राजेश याचा किरायदार राकेश याने झोपेत पहाटेच्या सुमारास वाटाणं दगड डोक्यात घालून निर्दयीपणे हत्या केली. 
सविस्तर असे, राकेश केवट हा अनेक वर्षांपासुन राजेश बोडकिलवार याच्या घरी भाड्याची रूम करून राहत होता. काही दिवसांपूर्वी राकेशच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते. पण त्याच्या पत्नीने आत्महात्याच केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला सोडून देण्यात आले. दरम्यान, राकेश केवट हा राजुर येथून दहा दिवस बेपत्ताही झाला होता.
घरमालक राजेश बोडकिलवारचा खून केल्यानंतर आरोपी राकेश केवट फरार झाला असुन, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे.
तूर्तास मित्रानेच मित्राची "हत्या "केल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. 
किरायदाराने घरमालकाचा केला खून किरायदाराने घरमालकाचा केला खून Reviewed by सह्याद्री चौफेर on June 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.