विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा उद्या दिनांक १७ ला यवतमाळ जिल्हा दौरा आहे.
सकाळी ११ .३० वाजता मारेगांव तालुक्यातील कुंभा, रामपूर कोलाम (पोड) भेट व समस्या वर जनता दरबार,
त्यानंतर केळापूर, घाटंजी, व झरी तालुक्यांना भेट, व पाथरी गावातील पिक कर्ज नुकसान भरपाई, जमिनीचे पट्टे, जातीचे प्रमाणपत्र, अन्न, आरोग्य, व सामाजिक सुरक्षा, विज, घरकुल, कृषी योजना, आदिवासी योजना याबाबत विविध विषयावर चर्चा व आढावा बैठक घेतली जाणार आहे.
या बैठकीला सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी जिल्हा अग्रमी बँक अधिकारी सर्व बँक व्यवस्थापक सर्व प्रमुख आरोग्य अधिकारी उपस्थित असणे आवश्यक आहे. त्यानंतर रात्री पांढरकवडा येथे मुक्काम.
सुधारित दौरा : किशोर तिवारी यांचा उद्या जिल्ह्यात दौरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 16, 2022
Rating:
