बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
उदगीर: पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर मार्फत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य उन्नत भारत अभियान व दत्तक ग्राम योजने अंतर्गत मौजे करंजी ता. जळकोट येथे मा. अधिष्ठाता डॉ. रावजी मुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण व पशु आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि. १४ जून २०२२ रोजी करण्यात आले.
शिबिरासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद डॉ. वकार अहमद, सहाय्यक प्राध्यापक, पशुप्रजनन शास्त्रविभाग व डॉ. आनंद मोहन, सहाय्यक प्राध्यापक, साथरोग निदान विभाग तथा समन्वयक, उन्नत भारत अभियान व दत्तक ग्राम करंजी उपस्थित होते.
शिबिरात एकूण ४४ जनावरांना लसीकरण, ११२ जनावरांची जंतनाशक फवारणी, ५३ जनावरांचे जंतनिर्मुलन औषधोपचार, ५ जनावरांना औषधोपचार, ३२ जनावरांची प्रजनन तपासणी व १ जनावरावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सदर शिबिरासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ.सुरेखा नामवाड यांनी लसपूरवठा केला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. आनंद मोहन, समन्वयक उन्नत भारत अभियान व दत्तक ग्राम तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी डॉ.गणेश स्वामी, डॉ.सोनल नाटकर, डॉ.अनुज कोळी, डॉ.नेहा गायकवाड, माधुरी आटला, आकांक्षा आवळे, ओंकार अंदुरे, अनुजा आव्हाड, योगेश थोरात, शुभम सलामे, अनुप कुमार, दाउद शेख व महाविद्यालयातील कर्मचारी व करंजी येथील नागरिकांनी परिश्रम घेतले.
पशुवैद्यकीय महाविद्यालयामार्फत करंजी येथे लसीकरण व पशु आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 16, 2022
Rating:
