शिरपूर : काल झालेल्या अपघातातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर

वणी : खाजगी कंपनीच्या कामानिमित्त चंद्रपूरला जात असतांना मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात वांजरी (मजरा) येथील 2 युवक गंभीर जखमी झाले. ही घटना काल 28 जून दुपारी घडली होती. त्यापैकी एका युवकाचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश वांढरे (25) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
काल (28 जून) रोज मंगळवारला दुपारी खाजगी कंपनीचे मार्केटिंग काम करणारा युवक व त्याचा मित्र वणीहुन घुग्गुस मार्गे चंद्रपूर ला मोटारसायकल ने जात असतांना बेलोरा फाट्याजवळ दुचाकी क्र (MH 29 BA 8705) अनियंत्रित होऊन दोघेही गंभीर जखमी झाले होते. शिरपूर पोलीस स्टेशन ला प्रत्यक्षदर्शीनी माहिती दिली. तर काही नागरिकांनी त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. मात्र, यातील गणेश वांढरे याची प्रकृती चिंताजनक होती.
तालुक्यातील वांजरी येथील दोन युवक मोटरसायकलने चंद्रपूरला जात असतांना बेलोरा फाट्याजवळ त्यांच्या अपघात झाला. या अपघातात सचिन डोंगे (28) व गणेश वांढरे हे दोनही युवक गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ चंद्रपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. गणेश या युवकाची प्रकृती चिंताजनक होती. काल रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर सचिन डोंगे याचे वर उपचार सुरु आहे असे समजते.

गणेश याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे.
शिरपूर : काल झालेल्या अपघातातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू शिरपूर : काल झालेल्या अपघातातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on June 29, 2022 Rating: 5
Powered by Blogger.