कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : 26 जून रोजी श्री रंगनाथ स्वामी नागरी सह. पतसंस्थेची निवडणूक पार पडली. यात दोन गटात कमालीची चूरशी झाली. अनेकांना 35 टक्के मतदान झाल्याने विजयाची माळ कोणाच्या पत्यावर, अशी धाकधूक होती. मात्र मतदारांनी दहा बाय दहा व विस वर्षाची यशस्वी ही वाटचाल मनी बाळगून खातेदार, ठेवीदार सभासदांचे हित जोपासणाऱ्या नेतृत्वाकडे मतदारांचा कल झुकला, व जय सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला.
रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या निवडणुकीतील विजयाची माळ अॅड. देविदास काळे यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ढोल पथकावर काळे समर्थक बेधुंद होऊन थिरकले. विजयी उमेदवारांची सजलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, जय सहकार पॅनलच्या उमेदवारांनी संयमी प्रचार केला. अॅड. काळे यांचा पतसंस्थेच्या यशात असलेला महत्वाचा वाटा उमेदवारांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहिला. आजवर या पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहिल्या. यापुढेही ही पतसंस्था सुरक्षित हातातच रहावी म्हणून मतदारांनी अॅड. देविदास काळे यांच्यावरच विश्वास दाखविला. असे विजयी उमेदवार अरविंद ठाकरे बोलताना सांगितले आहे. पतसंस्थेच्या निवडणुकीत भरगोस मतांनी दिल्याबद्दल माझे सर्व हितचिंतक, माझे सहकारी व मतदार राजाचे मनापासून जाहीरपणे आभार अरविंद ठाकरे यांच्या वतीने मानण्यात आले.
एकंदरीत मतदारांनी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीचे मानकरी ठरलेल्या अॅड. काळे यांच्या नेतृत्वावरच पसंती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विजयानंतर जय सहकार पॅनलच्या समर्थकांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.
"रंगनाथ" च्या विजयानंतर शहरात एकच जल्लोष!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 29, 2022
Rating:
