चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
वणी : राजूर रेल्वे च्या जागेवर स्थापन झालेल्या विविध कोळसा कंपन्यांच्या कोळसा सायडिंग रहिवासी क्षेत्राला लागून गावात असल्याने प्रचंड प्रदूषण निर्माण होऊन गावातील जनतेला विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. राजूर ग्रापं व प्र.नि. बोर्डाची परवानगी नसलेल्या ह्या अवैध कोळसा सायडिंग ला हटविण्यासाठी ग्रामवासीयांनी निवेदने व आंदोलन करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने दि.4 जुलै 22 पासून राजूर रिंग रोडवर राजूर बचाव संघर्ष समितीचे बॅनर खाली बेमुदत रास्ता आंदोलन करण्यात येणार आहे.
राजूर परिसरात तांत्रिक दृष्ट्या गावाचा सीमेत येत नसले तरीही गावाला लागून असलेल्या कोळसा वॉशरीच्या कोळसा सायडिंग राजूर गावात असल्याने रात्रंदिवस सुरू असलेल्या कार्यामुळे प्रचंड प्रदूषण निर्माण होत आहे. प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या कुठल्याही नियमाला किंवा निकषाला पूर्ण न करता व परवानगी न घेता मनमानी पद्धतीने इथे कोळसा सायडिंग सुरू आहे. त्याच प्रमाणे ह्या कोळसा सायडिंगवर कोळसा आणण्यासाठी मोठ्या जड वाहनांच्या उपयोग केल्या जात असून राजूर रिंग रोड ज्याची क्षमता 15 ते 20 टनाची असताना 50 टन कोळशाची वाहतूक केल्या जात आहे. ह्या प्रकरणी राजूर वासीयांनी राजूर बचाव संघर्ष समिती समिती स्थापन करून संबंधित विभागाला निवेदने देऊन एक दिवशीय रास्ता रोको करण्यात आले होते. यावेळेस रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या निकषाला पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेण्यात येईल असे आश्वासन दिले व सात दिवसांच्या अवधी मागितला. 7 दिवस पूर्ण होऊनही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.
याच दरम्यान, राजूर बचाव संघर्ष समितीने राजूर ग्रापं मध्ये निवेदन देऊन ग्रामसभा घेतली व त्यामध्ये गावातील प्रदूषणाला कारणीभूत कोळसा सायडिंग, कोळसाडेपो हद्दपार करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच कोळसा वॉशरी सुद्धा गावाच्या सीमेपासून दूर नेण्याचा ठराव पारित करण्यात आला. राजूर ग्रापं ने सुद्धा कोळसा सायडिंग व कोल डेपो बंद करण्याची नोटीस संबंधितांना बजावण्यात आली. या संदर्भात समिती सदस्यांनी मा. जिल्हाधिकारी यांची भेट मा. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे उपस्थितीत घेऊन प्रश्न मांडला. जिल्हाधिकारी साहेबांनी सर्वेक्षण करून कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. परंतु त्यावर अजूनही काहीही झाले नाही.
एवढे सगळे कमी आहे की काय, पुन्हा रेल्वे व वेकोली प्रशासन नव्याने कोळसा सायडिंग उभारण्यासाठी गावातील वस्तीला विस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी रेल्वे व वेकोली प्रशासन गावकऱ्यांना नोटिसा बजावीत आहे. ह्या सर्व प्रकाराने गावात प्रचंड असंतोष पसरला असून गावकरी रेल्वे व वेकोली प्रशासनाचे दडपणाखाली आणि प्रदूषणाच्या छायेखाली जगत आहेत. गावकऱ्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. करीता राजूर वासी राजूर बचाव संघर्ष समितीचे चे बॅनर खाली येथील अवैध कोळसा सायडिंग जोपर्यंत हटत नाही किंवा हद्दपार केल्या जात नाही तोपर्यंत दि. 4 जुलै पासून बेमुदत रास्ता रोको केल्या जाणार आहे.
या बाबतीत सूचना देणारे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत दि. 28 जून रोजी राजूर बचाव संघर्ष समिती कडून देण्यात आले आहे. या वेळेस समितीचे माजी जि. प. सदस्य संघदीप भगत, डेविड पेरकावार, मो. अस्लम, कुमार मोहरमपुरी, सय्यद अशफाक, साजिद खान, अनिल डवरे, जयंत कोयरे, प्रवीण खानझोडे, मो. शरीफ, सावन पाटील, फिरदोस अली, आकाश हनुमंते, मो. खुसनुर आदी उपस्थित होते.
राजूर वासीयांचा 4 जुलै पासून बेमुदत 'रास्ता रोको'
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 28, 2022
Rating:
