सेवानिवृत्त महिला पोलीस पाटील यांचा निरोप समारंभ


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यातील हनुमान नगर (घाटकिन्ही) येथील महिला पोलीस पाटील यांचा निरोप समारंभ दारव्हा पोलीस स्टेशन येथे पार पडला.

सोमवार दि.०६ जून रोजी तालुक्यातील प्रथम महिला पोलीस पाटील मान मिळवणाऱ्या सौ.शालिनीताई सुधाकर जाधव यांचा सेवानिवृत्त समारंभ दारव्हा पोलीस स्टेशन येथे ठाणेदार सुरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
शालिनीताई जाधव रा.हनुमाननगर (घाटकिन्ही) यांनी महिला पोलीस पाटील म्हणून गेल्या २० वर्षापासून अविरत सेवा दिली परंतु दि.०५/०४/२०२२ रोजी त्यांच्या वयानुसार ६० वर्षे पूर्ण झाल्याने त्यांना शासनाकडून सेवानिवृत्त करण्यात आले.

आज दि.०६ जूनला शालिनीताई जाधव यांचा एक छोटेखानी सेवानिवृत्त समारंभ तालुक्यातील पोलीस पाटील संघटने द्वारा आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ ठाणेदार सुरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता. शालिनीताई जाधव यांना ठाणेदार सुरेश मस्के यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

तसेच यावेळी देशकरी पाटील, ढोणे पाटील, प्रदीप राठोड पाटील, नरेंद्र महल्ले पाटील, श्याम गणेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या समारंभाला माजी सरपंच सुधाकर जाधव व तंटामुक्ती अध्यक्ष रामदास जाधव तसेच पोलिस स्टेशनचे कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते तर सूत्रसंचालन ढोके पाटील, श्याम गावंडे पाटील यांनी केले तर आभार प्रदीप राठोड पाटील व सुधाकर जाधव यांनी मानले..
सेवानिवृत्त महिला पोलीस पाटील यांचा निरोप समारंभ सेवानिवृत्त महिला पोलीस पाटील यांचा निरोप समारंभ Reviewed by सह्याद्री चौफेर on June 06, 2022 Rating: 5
Powered by Blogger.