विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या टाकरखेळा येथे हात उसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय शेतकरी नानाजी धानकी यांना मारहाण करण्यात आली. हा अपमान असाह्य झाल्याने पंधरा दिवसापूर्वी विष प्राशन केले. ही घटना २२ मे रोजी घडली होती.
दरम्यान, नानाजीने विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वणी येथे खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. नानाजी वर १३ दिवसांपासून उपचार सुरू असताना दि.५ जून रोजी संध्याकाळी दहा वाजताच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.
नानाजींनी गावातील विलास धानकी यांना आठ महिन्यांपूर्वी ५० हजार रुपये हात उसने आर्थिक देवाण केली. ती परत मागण्याचे दृष्टीने दि.२२ मे रोजी विचारले असता विलास धानकी सह मयूर धानकी, चंद्रकला धानकी रा.टाकरखेडा व मारेगाव येथील विठ्ठल रांगणकर यांनी टाकरखेडा स्थित मारहाण केली. हा अपमान जिव्हारी लागल्याने नानाजी धानकी यांनी विष प्राशन केले. यास कारणीभूत असलेल्या चार जणांविरुद्ध पत्नी सुभद्रा नानाजी धानकी यांनी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती.
विष प्राशन केलेल्या शेतकऱ्यांस मारेगाव रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अस्वस्थामुळे पुढील उपचारार्थ वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल पंधरा दिवस उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने नानाजी धानकी यांनी रविवारच्या संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. परिणामी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून वरील चार जणांविरुद्ध पतीच्या मृत्यूला कारणभूत असल्याचा ठपका ठेवत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी मयतच्या पत्नी सुभद्रा नानाजी धानकी यांनी केली.