श्री लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्थेचा उदघाटन सोहळा कॅबिनेट मंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : शहरातील श्री लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्थेचा उदघाटन सोहळा कॅबिनेट मंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला.

छोटया बचतीची सवय लावून सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नती साधण्याकरिता सहकार्य तसेच महिलांना व बचत गटांना बचतीची सवय लावणे व उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणे हा दृष्टीकोन समोर ठेवावा असे मत कॅबिनेट मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला व महिलांना बचतीची सवय यासाठी श्री लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्या. चांगल्या संधी उपलब्ध करीत आहे. या शाखेचा उदघाटन सोहळा दि.4 जून 2022 शनिवार रोजी मा ना यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडला.

या उदघाटन सोहळ्याला उदघाटक म्हणून मा ना यशोमती ठाकूर तर अध्यक्षस्थानी खासदार मा बाळूभाऊ धानोरकर, विशेष अतिथी माजी आमदार वामनराव कासावार, सौ प्रतिभा धानोरकर आमदार वरोरा-भद्रावती, माजी आमदार वामनराव चटप राजुरा विधानसभा क्षेत्र, वसंतभाऊ घुईखेडकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, टिकाराम कोंगरे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, प्रफुल मानकर अध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी, संजय देरकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, सौ. अरुणा खंडाळकर माजी सभापती महिला व बालकल्याण जि.प. यवतमाळ, नितीन कुंभलकर सहसचिव काँग्रेस कमिटी, प्रदीप बोनगीरवार अध्यक्ष स्वावलंबी शिक्षण संस्था वणी, नरेंद्र पा.ठाकरे माजी सभापती शिक्षण व आरोग्य जि.प. यवतमाळ, सौ वंदना आवारी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, वरील सर्व प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरकुटे सर यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संजय खाडे अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन निधी लि. यांनी केले. यावेळेस सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य केले. या उदघाटन सोहळ्यात हजारो लोकांनी हजेरी लावली.
श्री लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्थेचा उदघाटन सोहळा कॅबिनेट मंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते संपन्न श्री लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्थेचा उदघाटन सोहळा कॅबिनेट मंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on June 06, 2022 Rating: 5
Powered by Blogger.