सह्याद्री | चौफेर न्यूज
वणी : आज दिनांक ५ जून २०२२ रोजी गृह प्रवेशाचे औचित्य साधून वेले परिवाराच्या वतीने "जागतिक पर्यावरण दिवस" दिनी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाचे उदघाटन सौ वेले यांचे शुभहस्ते झाले.
कोरोना काळात ऑक्सिजन चे महत्व ओळखून प्रत्येकाने आपल्या घरी व्ही परिसरात किमान एक तरी झाड लावा..! म्हणजे भविष्यात तुम्हाला ऑक्सिजनसाठी कधी रांगा लावाव्या लागणार नाहीत व ऑक्सिजन कमी पडणार नाही.
गृह प्रवेश निमित्ताने कार्यक्रमाच्या समारोपसमयी पाहुण्यांसह सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. या अनोख्या गृह प्रवेश सोहळ्या निमित्त वेले परिवारातर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉ. आनंद वेले, सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसूटकर, सह्याद्री चौफेर चे सर्वेसर्वा कुमार अमोल कुमरे यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.
वेले परिवाराच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गृह प्रवेश व वृक्षारोपण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 05, 2022
Rating:
