कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
चंद्रपूर : प्रेरणास्थान माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री तथा लोक लेखा समिती प्रमुख विधिमंडळ यांचे सेवाभावी कार्य डोळ्यासमोर ठेवून माननीय श्री अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 4/6/2022 ला मौजा विचोडा (बू) येथील मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र चिकित्सा शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
परंतु डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे निधनाने शिबिर घ्यायचे की, नाही एक प्रकारे संभ्रम निर्माण झाला होता. त्याच वेळी मा. आमदार सुधीर भाऊ यांची जनतेविषयी अविरत सेवा या सेवेत कुठेही खंड न पडू देता. कितीही मोठे संकट आले तरी लोकांची सेवा थांबता कामा नये जेव्हा हे सेवाकार्य आठवणींचे रुपयात डोळ्यासमोर आले. तेव्हा अनिल डोंगरे यांचा वाढदिवस साजरा न करता शेतकरी शेतमजूर वयोवृद्ध लोकांची या शिबिराच्या माध्यमातून सेवा करता यावी म्हणून शिबिर घेण्याचे ठरविण्यात आले. शिबिराची सुरुवात स्वर्गवासी डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या फोटोला श्रद्धांजली वाहून दोन मिनिटांचा मौंन पाळून झाली.
महात्मा गांधी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम वर्धा व शिवसाई क्लिनिक नागपुर या तज्ञ डॉक्टरच्या उपस्थित या शिबिरात ग्रामीण भागातील आजूबाजूच्या गावचे 750 लोकांनी भाग घेतला त्यामधील 65 लोक मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी पात्र ठरले. त्यामधील पन्नास लोकांना सेवाग्राम हॉस्पिटल मधील मोतीबिंदू शस्त्रक्रिया करीता पाठविण्यात आले. व 265 नेत्रचिकित्सा लाभार्थ्यांना चष्मा साठी पात्र ठेवण्यात आले. या पात्र चष्मे लाभार्थ्यांना दिनांक 12/6/2022 ला रोज रविवार ला चष्मे देण्यात येणाचे ठरविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा मा. श्री विजय आग्रे तालुका महामंत्री भाजपा मा.अजय चालेकर. मा विनोद खडसे. मा.सौ अनिता भोयर मा.दुर्गा बावणे मा.सौ. माधुरी सागौरे. मा.किरण डोंगरे मा.किरण अलोने. मा. सौ कल्पना गुणे. मा सौ प्रतिभा पत्रकार मा.विजय माशिरकर. मा.अर्जुन नागरकर. मा.विनोद थेरे. मा. सुदर्शन निषाद मा. पुरुषोत्तम वाढई. यांची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री प्रमोद जाधव. श्री राजू डोंगरे, श्री सागर महाले, श्रीअमोल महल्ले. श्री मिथुन वानखेडे, श्री संदीप ठाकरे, श्री गोविंदा गणफुले, श्री पवन डोंगरे, श्री प्रशांत पिंगे, श्री.पवन शिवदे यांनी अथक परिश्रम घेतले.
स्वर्गवासी डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांना समर्पित मोतीबिंदू व नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 05, 2022
Rating:
