चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
वणी : अवैधरित्या दारूची दुचाकीमधून वाहतूक नांदेपेरा ते देवी वनोजा (ता. मारेगाव) परिसरात होत असून याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार नांदेपेरामधून चार पाच पेट्या (बॉक्स) अवैधरित्या दारूची वाहतूक करत देवी वनोजा या परिसरात सकाळी, सायंकाळी तर दारू विक्रेत्याच्या मागणीनुसार दारूची अवैध वाहतूक केली जाते. त्यामुळे गावातील महिला त्रस्त झाल्या आहे. तसेच देवी येथे दर्शनाला येणाऱ्या भक्तांना या मद्यपी चा नाहक त्रास सहन करावा लागतोय. शिवाय या परिसरासह नांदेपेरा देवी मार्डी मार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या दारूचमुळेच गेल्या काही दिवसात झालेल्या अपघाताचे कारण असल्याचे चर्चा एकावयास मिळते.
"गाव तिथे दारू" असे जणू घोरणच या अवैध दारू तस्करांनी अवलंबिल्याचे दिसून येत आहे. याला पोलीस प्रशासन, स्थानिक पोलीस पाटील आणि सरपंच हात मिळवणी करित असल्याचा नागरिकांच्या तक्रारी आहे. पोलीस पाटील नेमलेले आहे. ह्यांना आपल्या परिसरात होत असलेले गुन्हेगारी, अवैध्य धंदे याबाबत माहिती पोलीस दरबारी द्यायचे काम आहे. मात्र, असे असतांना सरपंच, पोलीस पाटील यांच्या नाकावर टीच्चून या परिसरात अवैध्यरित्या दारूची वाहतूक होत आहे.
देवी वनोजा परिसरात अवैद्यरित्या दारूची वाहतूक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 05, 2022
Rating:
