टॉप बातम्या

पावसाळा तोंडावर, घाटावरील रेतीचा उपसा जोमात

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : पावसाळा तोंडावर आल्याने तालुक्यात राजरोसपणे रेती तस्कराकडून वाळूचा उपसा जोमात सुरू आहे. याकडे स्थानिक पदाधिकारी,वाहतूक विभाग,पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

सूत्राच्या माहितीनुसार मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपटी, कोसारा परिसरातील घाटावरील अवैधरित्या वाळू उपसा मोठया प्रमाणात केला जात आहे. पावसाळा तोंडावर आला, म्हणून की काय रेतीचा उपसा करून शेत शिवारात साठवल्या जात आहे. स्वतः ची मक्तेदारी असल्याचे समजून त्यामुळे घरकुल योजनेअंतर्गत घरे बांधणाऱ्याना मोठी रक्कम मोजावी लागते. म्हणेल त्या भावात रेतीसाठी दमडी द्यावी लागत असतांना अवैध वाळू उपसा करणार्‍या रेती तस्करांवर कारवाई का होत नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.
रेती चा अहोरात्र उपसा करणार्‍या तस्करांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांच्या मार्फत निलंबनाची कारवाई केली जाईल का? त्याचप्रमाणे अवैध उपसा करणाऱ्या जेसीबी, विना नंबर चे ट्रॅक्टर आणि ट्रक जप्त करून वाळू माफियांवर कठोर कारवाई होणार का ? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असताना शासनाचा महसूल बुडवून तसेच स्वार्थापोटी निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्या "पुष्पा" वर कधी कारवाई होणार, हे पाहण्यासाठी नागरिकांच्या नजरा लागल्या आहे.
Previous Post Next Post