विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : प्रसिद्ध असलेले अठरा साधूचे गाव नरसाळा, येथील एका गर्भवती महिलेस अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर असे की, नरसाळा येथे एका गर्भवती महिलेला श्रीकांत ने घरी जाऊन तुझा नवरा कुठे गेला? त्याला सांग तुम्हाला खतम करून टाकतो, असे धमकावून तिला प्रचंड अश्लील आणि लज्जास्पद शिवीगाळ केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आरोपी श्रीकांत देशपांडे विरुद्ध भांदवी च्या कलम 292 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे
आरोपी वर नेहमीच धमकाविणे, खंडणी मागणे, महिलांना अश्लील शिव्या देणे, असले अनेक गुन्हे दाखल होत असल्याने नरसाळा येथील ग्रामस्थाकडून बोलल्या जात आहे.
अश्लील शिवीगाळ केल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 05, 2022
Rating:
