लातूर जिल्ह्याचे माहिती अधिकारी युवराज पाटील यांची उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयास सदिच्छा भेट

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश सह इतर ठिकाणी नावलौकिक प्राप्त झालेल्या उदगीर येथील उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथे लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी रुग्णालयास सदिच्छा भेट देऊन रुग्णालयातील रुग्णांची प्रेमपूर्वक व सुसज्ज असे असलेल्या विभागाची आस्थेवाईकपणे चौकशी करून घेतली. यावेळी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे संस्थापक अध्यक्ष रामप्रसाद लखोटिया यांनी युवराज पाटील यांना *दृष्टी* हा अंक देऊन त्यांचा सन्मान केला व रुग्णालयातील प्रकल्पाची स्थापना झाल्यापासून आजता गायत रुग्णालयाची झालेली भरभराट व सध्या चालू असलेल्या प्रकल्प विषयी माहिती डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांनी दिली. रुग्णालयाचे अति उत्कृष्ट कार्य पाहून युवराज पाटील यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करुन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या सदिच्छा भेटीच्या वेळी उद्योगपती अजय मलगे, दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार व्ही.एस. कुलकर्णी, उदगीर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ मोतीपवळे, साहित्य संस्कृती मंडळाचे नवनिर्वाचित सदस्य तथा पत्रकार धनंजय गुडसूरकर, उदयगिरी महाविद्यालयातील प्राध्यापक तथा दैनिक सिद्धेश्वर समाचार चे तालुका प्रतिनिधी प्रा. प्रवीण जाहूरे, श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयातील शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शाळांचे मुख्य ग्रुप ॲडमिन बालाजी सुवर्णकार, कै. विलास भोसले प्राथमिक विद्यालय उदगीर येथील सहशिक्षक पाटील सर व रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी (पी.आर.ओ.) गणेश मुंढे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
लातूर जिल्ह्याचे माहिती अधिकारी युवराज पाटील यांची उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयास सदिच्छा भेट लातूर जिल्ह्याचे माहिती अधिकारी युवराज पाटील यांची उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयास सदिच्छा भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on June 04, 2022 Rating: 5
Powered by Blogger.