विद्यार्थिनींने गळफास घेवून संपविली जीवन यात्रा

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : काल 8 जूनला माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षाचे निकाल जाहीर झाले. त्यात ती उत्तीर्णही झाली. मात्र, दहावीला 90 टक्के आणि बारावीला 65 टक्के गुण फक्त मिळाले, परंतु मिळालेल्या गुणांवर समाधान न बाळगता चक्क!विद्यार्थ्यांनीने गळफास घेवून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

मोनू अनिल सालूरकर (18) रा. लालगुडा असे गळफास घेवून जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांनीचे नाव आहे. 
मोनूने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला असून, तिच्या अशा निघून जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.
12 वी च्या परीक्षेत अपेक्षे प्रमाणे गुण न मिळाल्याने नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याची चर्चा गावातून ऐकावयास मिळत आहे. मोनूने घरातील छताच्या लोखंडी सळाखीला स्कार्फने गळफास लावून आत्महत्या केली. तिचे वडील हे गवंडी काम करतात. त्यांना दोनच मुली असून, एक मुलगी शिक्षण घेत आहे.
घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

मोनूच्या आत्महत्याचे नेमके कारण अस्पष्ट असून पुढील तपास पोलिस करित आहे.



विद्यार्थिनींने गळफास घेवून संपविली जीवन यात्रा विद्यार्थिनींने गळफास घेवून संपविली जीवन यात्रा Reviewed by सह्याद्री चौफेर on June 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.