सह्याद्री | चौफेर न्यूज
वणी : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहे. नुपूर शर्मा यांच्या व्यक्तव्याचा भारता सह सर्व जगात मुस्लिम समुदाय निषेध नोंदवीत आहे.
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला दुजोरा नवीन जिंदल व यति स्वरुपानंद यांनी दिला यांच्या निषेधार्थ वणी येथे शुक्रवार दिनांक 10 जून 2022 ला दुपारी 2.30 वाजता विशाल जन आक्रोश रॅलीचे आयोजन, वणीचे शासकीय मैदान,पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आले आहे. या रॅली मध्ये समस्त मुस्लिम समाज बांधवांनी, महिला, युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन "शहर-ए-मदिना" सोशल फाउंडेशन तथा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
उद्या वणी शहरात विशाल "जन आक्रोश" रॅली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 09, 2022
Rating:
