विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : लग्न होऊन 3 वर्षे झालेल्या एका (22) वर्षीय महिलेची तिच्या सासरच्यांनी हुंड्या साठी हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. घाटंजी तालुक्यातील टिटवी येथे ही घटना घडली आहे. या घटनेत माहिलेचा अमानुष छळ करून तिची हत्या करण्यात आली, अशी तक्रार मृतक महिलेच्या भावाने पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
सुवर्णा बुच्चे हिचे सतीश गंडेसोबत (2019) मध्ये लग्न झाले. लग्न झाल्यानंतर काही दिवस आनंदात गेले, लग्नात एक लाख रुपये व 3 ग्रॅमची सोन्याची अंगठी असे हुंडा म्हणून दिले होते. लग्नानंतर सासरी नांदत असतांना काही दिवस तिला चांगले वागविले. मात्र, गंडे परिवाराचा डोळा तिच्या लग्नात मिळालेला हुंडा वर टक लावून असल्याने सतीशने पत्नी सुवर्णाला पुन्हा दोन लाख रुपये माहेरून घेवून येण्यासाठी तगादा लावला. मात्र, मुलीच्या माहेरची परिस्थिती हालाखीची असल्याने सासरच्या मंडळींनी केलेली मागणी ती पूर्ण करू शकत नव्हती. यामुळे सासरकडच्यांनी विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. दरम्यान तिचा छळ करण्यात येत असतांना तिने माहेरच्यांना फोनवर सर्व आपबीती सांगितले. चार महिन्यापूर्वी घरच्यांनी तिला गावी आणून तिला समजूत काढली, "नवरा आज ना उद्या सुधरेल" काही दिवस तू शांत राहा म्हणून सांगितले. त्यानंतरही तिला वेगवेगळ्या कारणांनी मारहाण करून पैशाची मागणी करणे, व जीवे मारण्याची धमकी देत असत.
7 जूनला रात्री 8:30 वा. दरम्यान, प्रमोद गंडे (चुलत भासरा) यांनी फोन करून सांगितले की, सुवर्णाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही बातमी समजताच माहेरची मंडळी नातेवाईकांसह रात्रीच टिटवी येथे पोहचले. त्यावेळी सुवर्णाला खाली टाकलेले होते. दुसऱ्या दिवशी मृतक सुवर्णाचा भाऊ प्रवीण बुच्चे यांनी पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यात सुवर्णाची आत्महत्या नसून हत्याच आहे. कारण तिच्या पाठीवर, गळ्यावर खर्चटलेल्या खुणा व जखमेचे निशान आढळून आले. यावरून माझ्या बहिणीच्या मृत्यूस पती सतीश गंडे (28), भाऊ विशाल गंडे, जाऊ कविता गंडे, आणि सासू कुसुम गंडे हे सर्व कारणीभूत आहे असा आरोप केला. तक्रारीवरून पोलिसांनी कलम 304 (ब), 306, 498 (अ), 323, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपविभागायीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
वनोजा येथील विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या; सासरच्यांवर गुन्हा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 09, 2022
Rating:
