विवेकानंद कला वाणिज्य महाविद्यालय कान्हाळगाव चा १०० टक्के निकाल

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगांव : काल बारावीचा निकाल जाहीर झाला. यात विवेकानंद कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, कान्हाळगांव च्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली. विशेष म्हणजे विवेकानंद कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, कान्हाळगाव चा 100 टक्के निकाल लागला आहे. 

यात वाणिज्य शाखेमधून विद्यार्थिनी कु. अमिता अमर गजबे ही  (87टक्के) मिळून महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे. व अकाउंट या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून वाणिज्य शाखेतून व तालुक्यातून व महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर वाणिज्य शाखेतून विद्यार्थी सोपान लक्ष्मण बोढे याला  (86.17 टक्के) प्राप्त केले आहे, महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर वाणिज्य शाखेतून कु.अनिता रघुनाथ आवारी हिला गुण (81. 83टक्के ) मिळवून महाविद्यालयातून तृतीय क्रमांक मिळवला आहे.तसेच 
कु.वैष्णवी संजय भोयर हिला अकाउंट विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. वाणिज्य शाखेतील 
विशेष प्राविण्य 7 विद्यार्थी व प्रथम श्रेणीत 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेतून साक्षी विजय गोवारकर हिला गुण (71.17) टक्के मिळवून प्रथम आली आहे.
कु. आचल सिद्धार्थ ढाले हिला गुण (67.17 टक्के ) मिळवून द्वितीय आली आहे. तर
कु. किर्ती राजू मुरके हिला गुण  (66.83 टक्के) घेऊन कनिष्ठ महाविद्यालयातून तृतीय आली आहेत.

कला शाखेतील प्रथम श्रेणीत 13 विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाने कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव मोठे केले आहे.
 या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे शिक्षकांना दिले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपला जल्लोष व्यक्त केला आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्री.ठावरी सर, प्राचार्य श्री एस वि देरकर, कु. बी आर कालेकर मॅडम, कु. पी डी पोटे मॅडम, श्री व्ही टी कुळमेथे सर, श्री डी एन पुडके सर, श्री एन जी जाधव सर, लिपिक लडके, सेवक श्री देठे, यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

विवेकानंद कला वाणिज्य महाविद्यालय कान्हाळगाव चा १०० टक्के निकाल विवेकानंद कला वाणिज्य महाविद्यालय कान्हाळगाव चा  १०० टक्के निकाल  Reviewed by सह्याद्री चौफेर on June 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.