आदिवासी सन्मान परिषदेकडे नेत्यांनी फिरवली पाठ


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : जननायक बिरसा मुंडा यांच्या १२२ व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने बिरसा क्रांती दल विदर्भाच्या वतीने यवतमाळ येथे दिनांक ९ जून २०२२ रोजी दु. १२ वाजता आदिवासी सन्मान परिषद आयोजित होती. मात्र, उदघाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी विकास मंत्री अॅड. के सी पाडवी, प्रमुख अतिथी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंतराव पुरके आदींनी या आदिवासी सन्मान परिषदेकडे पाठ फिरविल्याने कार्यक्रमाचा फज्जा उडाला अशी चर्चा रंगली होती.

परिषद आपला सन्मान आपणच राखला पाहिजे, हे ब्रिद वाक्य समोर ठेऊन बिरसा क्रांती दल गेल्या सात वर्षापासून महाराष्ट्रात काम करीत असे सांगण्यात येते. मात्र,या बिरसा क्रांती दलाच्या माध्यमातून केवळ राजकीय पोळी शेकण्याचा संस्थापक अध्यक्षाचा प्रयत्न असल्याचे समाजबांधवांनध्ये
या आदिवासी सन्मान बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे जिल्हयात तीन ठिकाणी अनुसूचित जमातीचे आमदार राखीव असून या आमदारांना या आदिवासी सन्मान परिषदेमध्ये डावलण्यात आल्याने समाजबांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी जवळपास लाखों रुपयाचा बजेट गृहीत धरून अनेकांकडून देणगी गोळा केली. अशी चर्चा समाज बांधवांमध्ये केल्या जात आहे. आजवर बिरसा क्रांती दलाला आदिवासींचा क्रांतीकारक इतिहास आदिवासी संस्कृती, आदिवासींचे संवैधानिक अधिकार, आदिवासींचे शिक्षण, उद्योग, रोजगार, आदिवासी विकासाच्या विविध योजना पेसा, अॅट्रोसिटी वनाधिकार, जमिन हस्तांतरण या विषयाशी काही देणे घेणे नसून केवळ स्थानिक जात आहे.

स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपला समाज आमच्या पाठीशी आहे. असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न या आदिवासी सन्मान परिषदेतून करण्यात आला. विशेष म्हणजे एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या दावणीला हा बिरसा क्रांती दल बांधला की काय असा आदिवासी समाज बांधवांमध्ये प्रश्न उपस्थित केला
आदिवासी सन्मान परिषदेकडे नेत्यांनी फिरवली पाठ आदिवासी सन्मान परिषदेकडे नेत्यांनी फिरवली पाठ Reviewed by सह्याद्री चौफेर on June 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.