हिवरा,कानडा, व मुकटा सहकारी सोसायटी वर अध्यक्ष उपाध्यक्षाची बिनविरोध निवड

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : हिवरा,मुकटा व कानडा विविध कार्यकारी सहकारी संस्थाचा कार्यकाळ सम्पूष्टांत आल्यामुळे सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम पार पडला. या निवडणुक मैदानात शेतकरी समन्वय पॅनल व शेतकरी विकास पॅनल आमने सामने उभे होते. चुरशी च्या सामन्यात शेतकरी समन्वय पॅनलचे १० तर, शेतकरी विकास पॅनलचे ३ संचालक विजयी झाले आहे.
तालुक्याचे लक्ष लागलेल्या हिवरा, मुकटा व कानडा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल दि. २७ मे च्या सायंकाळी सात वाजता जाहिर करण्यात आला. ही निवडणुक अत्यंत चूरशीची झाली. या निवडणुकीत शेतकरी समन्वय पॅनलचे विरोधात शेतकरी एकता पॅनल आमने सामने उभे करण्यात आले होते. दोनही पॅनलसाठी ही निवडणुक अस्तित्वाची मानली जात असतांना  या निवडणुकीला परिसरात चांगलाच रंग चढला होता.
या सोसायटी वर अध्यक्ष म्हणून हिवरा येथील छत्रपती ठावरी तर उपाध्यक्ष पदी कानडा येथील बालाजी आस्कर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
या निवडणुकीत बाबा भोयर, पुरुषोत्तम बुट्टे, जीवन काळे, अनता निब्रड, राजू चाभारे, देवराव आवारी, अरुण आस्कर, नामदेव भोंग, विनोद धोबे, राजु आस्कर, रमेश ढोके इत्यादी प्रमुखानी विजयासाठी परिश्रम घेतले. विजयी उमेदवारांचे मार्डी सर्कलचे सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांतभाऊ भंडारी यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांना प्रसिद्धी पत्रकातून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हिवरा,कानडा, व मुकटा सहकारी सोसायटी वर अध्यक्ष उपाध्यक्षाची बिनविरोध निवड हिवरा,कानडा, व मुकटा सहकारी सोसायटी वर अध्यक्ष उपाध्यक्षाची बिनविरोध निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on June 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.