चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : काल बारावी चा निकाल जाहीर झाला. यात खोपडी (खुर्द) येथील विद्यार्थ्यांने दारव्हा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. कु.सुजल राजेश आडे यांनी ९१ टक्के घेवून विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. ते स्वामी विवेकानंद विघालय बोदेगाव या शाळेमध्ये शिकत होता.
सुजल यांचे आई वडील शेतमजुरी करतात. मोलमजुरी, काबाडकष्ट करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या प्रथम क्रमांकाने आई वडिलांना अभिमान असल्याचे सांगितले जात आहे. सुजल तालुक्यात विज्ञान शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने कौतुकास्पद असल्याचे मुख्याध्यापक यांनी स्पष्ट केले.
वडील राजेश आडे, आई सलोनी आडे, काका हेमंत आडे, व त्यांचे आजोबा श्रीचंड आडे, व मित्र परिवार व तसेच गावातील जेष्ठ मंडळी सुजलचे कौतुकासह अभिनंदनाचा सर्वत्र वर्षाव होत आहे.
सुजल आडेंनी पटकाविला प्रथम क्रमांक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 09, 2022
Rating:
