काल रात्री एकाचा अपघाती मृत्यू तर, आज सकाळी एक युवक अपघातात ठार

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : तालुक्यात काल लालपलिया आणि आज सकाळी निळापूर रोड वर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला.

 दि.8 जूनला रात्री 9 वाजताच्या सुमारास वणी-यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरात झालेल्या अपघातात अभिजित अरविंद राऊत (25) रा विठ्ठलवाडी येथील तरुणाचा मृत्यू झाला. मृतक हा कुटुंबाचा प्रमुख आधार असल्याचे बोलल्या जाते. तसेच अभिजित राऊत भाजपयुमो शहर उपाध्यक्ष होते. तर आंबेडकर चौक येथे ऑइल विक्रीचे दुकान आहे. 
 काल 8 जूनला रात्री 9 वाजताच्या सुमारास तो लालपुलिया परिसरातील ग्राहकांकडे पैशाच्या वसुली करिता गेला असता अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला आधी चंद्रपूरला रेफर करण्यात आले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला सेवाग्राम येथे हविण्याचा सल्ला दिला. सेवाग्राम येथे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुस्वभावी व मेहनती तरुण म्हणून त्याची परिसरात ओळख होती. तो कुटुंबाचा प्रमुख आधार होता. त्याच्या अशा या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पाठीमागे आई, वडील व भाऊ असा आप्त परिवार आहे.
शहरातील घटना ताजी असतांना आज 9 जूनला सकाळी 8:15 वाजताच्या सुमारास निळापूर (ब्राम्हणी) रोडवरील इंदिरा जिनिंग जवळ आकाश अनिल डाखरे (22) रा. ब्राह्मणी असे या अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण देखील घराचा कर्ता व्यक्ती होता,कोल वॉशरी मध्ये तो कर्तव्यावर होता. आकाश काही कामानिमित्त वणीला आला होता. वणीहुन ब्राह्मणीला परत जाताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. त्याच्यावर अपघाती मृत्यु ओढावल्याने ब्रम्हणी गावात शोककळा पसरली आहे. 
काल रात्री एकाचा अपघाती मृत्यू तर, आज सकाळी एक युवक अपघातात ठार काल रात्री एकाचा अपघाती मृत्यू तर, आज सकाळी एक युवक अपघातात ठार Reviewed by सह्याद्री चौफेर on June 09, 2022 Rating: 5
Powered by Blogger.