टॉप बातम्या

मुलीच्या पाठोपाठ वडिलाने घेतलं "पॉईजन"

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील रोशनी झाडे (वैद्य) या चोवीस वर्षीय विवाहितीने आपल्या चिमुकलीसह राहत्या घरात गळफास घेतला. यात सुदैवाने चिमुकली बचावली. परंतु मातेचा मृत्यू झाला. या घटनेने मार्डी परिसर हळहळत असतांना मुलीच्या पाठोपाठ वडिलांने विष प्राशन केल्याचे समजते. जीवन वैद्य (अंदाजे वय ५४) रा. मार्डी, असे विष प्राशन केलेल्या इसमाचे नाव आहे. मृतक रोशनीच्या वडिलांना तात्काळ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून "पॉईजान" काढण्याचे प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.
मुलीच्या पाठोपाठ वडिलाने विष प्राशन केल्याने मार्डी परिसरातील दुसरी घटना असल्याने गाव हादरून गेला आहे. सदर घटना 5 वाजताच्या दरम्यान, जीवन याने सिंदीच्या मंदिरात विष प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यांना तात्काळ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकताच रोशनी (मुलगी) चा अंत्यविधी करण्यात आला असताना वडिलांने विष प्राशन केले. त्यामुळे विविध चर्चेला उधाण आले आहे.
Previous Post Next Post