कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : नांदेपेरा समस्या निवारण कृती समितीच्या वतीने आज दि.7 जून ला "रास्ता रोको आंदोलन" करण्यात आला. ओव्हरलोड कोळसा वाहतूक कायमस्वरूपी बंद करणे व तारेंद्र बोर्डे यांच्या शेतापासून ते नांदेपेरा बस स्थानक पर्यंत (अंदाजे 3 कि.मी.) या रस्त्याचे रुंदीकरण करून देण्यात यावे या प्रमुख मागण्या आंदोलन कर्त्यांनी यावेळी लावून धरल्या, आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास तीन साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. समस्यांचे निवारण होत नसल्याने आंदोलनकांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, वाहतूक नियंत्रण विभाग व पोलीस प्रशासनाचा मोठा ताफा हजर होता.
दरम्यान आंदोलन कर्त्यांनी समस्या व मागण्या वर उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून उद्या दि.8 जून ला दुपारी 12 वाजता वणी विश्राम गृह येथे वरील संदर्भात उपप्रादेशिक वाहन अधिकारी यवतमाळ यांच्या समवेत सा. बां.विभाग अधिकारी, महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली. सदर आंदोलनाबाबत चर्चा करून समस्यांची निवारण करण्याकरिता नांदेपेरा समस्या निवारण कृती समिती व सरपंच (नांदेपेरा, शेलू (बु), वांजरी, मजरा) यांना चर्चेसाठी विश्रामगृह वणी येथे उपस्थित राहण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले.
या आंदोलन दरम्यान, नांदेपेरासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे कार्यकर्ते व शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
नांदेपेरा येथे रास्ता रोको आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 07, 2022
Rating:
