राजूर वासियांनी केला रिंग रोड वर "रास्ता रोको आंदोलन"

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

राजूर कॉलरी : स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतची आत्मा आहे ग्रामसभा! ग्रामसभेच्या अधिकार हा सर्वोपरी व सार्वभौम असल्याने गावात कोणताही उद्योग स्थापित करण्यापूर्वी त्याची परवानगी आवश्यक असते आणि हीच परवानगी न घेता येथील कोळसा सायडिंग सुरू आहे. ह्या सायडिंगमुळे गावात प्रचंड प्रदूषण होत असल्याने चालत असलेली अवैध कोळशाची रेल्वे सायडिंग बंद करून गावापासून दूर नेण्यात यावी ह्या मागणीला घेऊन राजूर वासीयांनी राजूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने रिंग रोड वर रास्ता रोको करण्यात आले. यावेळेस रेल्वे अधिकाऱ्यांनी सात दिवसाचा अवधी मागून वेळ मारून नेली. जनतेला ठोस आश्वासन न मिळाल्याने राजूर वासी संतप्त असून, संघर्ष समितीने पुढे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या चार-पाच महिन्यापासून परिसरात कोळसा वॉशरी सुरू झाल्यात. हा कोळसा रेल्वे द्वारे राजूर येथून वीज कंपनीला पाठविल्या जातो. कोळसा वॉशरी सुरू झाल्याने परिसरातील तरुणांच्या हाताला काम मिळाले म्हणून जनता खुश होती त्यांनी ह्या कंपन्यांचे स्वागतही केले. परंतु राजूर येथे सुरू असलेली कोळसा सायडिंग राजूर ग्रामसभेची परवानगी न घेता सुरू झाली आणि प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, परिणामी गावात दमा, टीबी, त्वचा रोग, फुफुसाचे घातक परिणाम दिसायला लागले. गावातील घरांमध्ये कोळशाची भुकटी शिरली, घरातील साहित्य खराब व्हायला लागली. प्रदूषण नियंत्रण बोर्डाने घातलेल्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी करूनही त्याला दाद देण्यात आली नाही. हे कमी आहे की म्हणून रेल्वे विभागाने व वेकोली प्रशासनाने सायडिंग चे नावाखाली गरिबांची घरे खाली करण्याचा नोटिसा देणे सुरू केले. शेवटी त्रस्त जनतेने राजूर बचाव संघर्ष समितीचे बॅनर खाली एकत्र येत निर्वाणीचा इशारा देण्यासाठी राजूर रिंग रोडवर दि. ८ जून २२ ला रास्ता रोको करण्यात आले. 
या आंदोलनाचे नेतृत्व राजूर बचाव संघर्ष समितीने बनविलेली ३४ लोकांच्या समितीने केले असून त्यामध्ये प्रामुख्याने जि प सदस्य संघदीप भगत, सरपंच विद्याताई पेरकावार, माजी प स सदस्य अशोक वानखेडे, वसुंधरा ताई गजभिये,मो. असलम, डेव्हिड पेरकावार, कुमार मोहरमपुरी, प्रणिता मो. अस्लम, डॅनी सॅन्ड्रावार,अनिल डवरे, जयंत कोयरे, नंदकिशोर लोहकरे, राहुल कुंभारे, साजिद खान, नंदकिशोर मुन,रफिक सिद्दीकी, अमृत फुलझेले, प्रकाश तालावर,रतन राजगडकर, जगदीश पाटील, सुरज यादव,कन्हैय्या कल्पूलवार, एड.अरविंद सिडाम, श्रावण पाटील, मो. खुसनुर, सुशील अडकीने, शैलेश मेश्राम, लीलाधर आरमोरीकर व राजूर बचाव संघर्ष समिती चे सर्व सदस्य व समस्त राजूर ग्रामवासी यात सहभागी होते.
आंदोलनाला हजारोंच्या संख्येने गावकरी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान पोलिसांच्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राजूर वासियांनी केला रिंग रोड वर "रास्ता रोको आंदोलन" राजूर वासियांनी केला रिंग रोड वर "रास्ता रोको आंदोलन" Reviewed by सह्याद्री चौफेर on June 08, 2022 Rating: 5
Powered by Blogger.