चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
वणी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 चा निकाल आज जाहीर झाला. यात विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला.
यात कु अल्वीरा इकबाल कुरेशी (88.67 टक्के), रझिया मन्सूर शे (88.17 टक्के), श्रद्धां प्रदीप बल्की (80.33 टक्के) तर, कला शाखेचा निकाल 88.88 टक्के लागला. त्यात कु. रेवती लक्ष्मण नक्षीने (74 टक्के), सूरज मनोज टिपले (65 टक्के), कु. कोमल राजू भरटकर (64.33 टक्के), असा आहे.
विज्ञान शाखेत एकूण 152 पैकी 152 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर कला शाखेतील 117 पैकी 104 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण 269 विद्यार्थ्यांपैकी 256 उत्तीर्ण झाले, एकूण महाविद्यालयाचा निकाल 95.16 टक्के लागला.
कु. अल्वीरा कुरेशी विज्ञान शाखेतून प्रथम तर वणी शहरातून
कु. रझिया शेख द्वितीय आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री नरेंद्रजी नगरवाला, संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. रमेशजी बोहरा तर सचिव मा. श्री. लक्ष्मणजी भेदी, सहसचिव मा श्री. अशोकजी सोनटक्के तसेच मंडळाचे सन्माननीय सर्व सदस्य तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा श्री प्रमोदजी क्षीरसागर सर तर उपप्राचार्य मा. श्री. रमेशजी तामगाडगे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 08, 2022
Rating:
