योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
केळापूर : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीड अकोला संलग्नित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतंर्गत विद्यालयांच्या विद्यार्थीनी वैष्णवी भोयर, प्राजली डोंगे, राजश्री भस्मे, व आचल मिलमिले यांच्या पुढाकाराने (ता.5 जून) ला कोंघारा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गावकऱ्यांना वृक्ष भेट देऊन वृक्ष रोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून गजानन बोमेंवार कृषी मित्र व प्रा.वैभव काळे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला गावातील सरपंच दिनेश गेडाम,व उमेश वड ,किशोर काकडे, अक्षय पिंगळे, सुगंधा काकळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे व्यवस्थापक व मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य हेंमत वानखडे आणि सांगता प्रमुख प्रा.संकेत येलोरे यांनी केली.
कोंघारा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण कार्यक्रम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 07, 2022
Rating:
