विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : आपण आपलं समजून कोणाच्याही मदतीला धावून जातो अन लोकं त्याचा गैरफायदा घेतात किंबहुना लोकांना मदतीला धावून येणाऱ्यांचे काही देणं घेणं नसतं. "काम झालं मव अन काय करू तुवं" असाच प्रत्यय टाकरखेडा प्रकरणातून लक्षात येतेय. आर्थिक देवाण घेवाणचा वाद हाणामारीत झाल्याने एका शेतकऱ्याला अपमान असाह्य झाला व थेट विष प्राशन केले. याच दरम्यान, विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीने चौघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. विष प्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा रविवार दि.5 जून रोजी मृत्यू झाला. थेट मृत्यूदेह ठाण्यात नेला आणि चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संशायित आरोपीने गावातून "धूम" ठोकली. पोलिस संशयीतांच्या मागावर आहे.
सविस्तर असे की, टाकरखेडा येथील नानाजी धानकी यांनी येथीलच विलास धानकी यांना आर्थिक हातउसने मदत केल्यानंतर ही रक्कम परत मागण्यासाठी गेले असता नानाजी यांना विलास धानकी, मयूर धानकी, चंद्रकला धानकी व विठ्ठल रांगणकर या चौघांनी मारहाण केली.ही अपमानास्पद घटना जिव्हारी लावत नानाजी धानकी यांनी विष प्राशन केले. ही घटना 22 मे ला घडली होती. वणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना उपचारादरम्यान 5 जून रोजी सायंकाळी दहा वाजताच्या दरम्यान, त्यांचा तब्बल पंधरा दिवसानंतर दुर्देवी मृत्यू झाला. विष घेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करीत मृतकाच्या पत्नीने त्यांच्या उपचारादरम्यान मारेगाव पोलिसात चौघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
तक्रारीची व घटनेची गंभीर दखल घेत विलास, मयूर,चंद्रकला धानकी आणि विठ्ठल रांगणकर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून कलम ३०६ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संशायित आरोपींनी गावातून पोबारा केला. पोलीसांनी धरपकडची गती वाढवली आहे.
टाकरखेडा प्रकरण: धानकी परिवार ठाण्यात धडकले ;चौघावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 07, 2022
Rating:
