सह्याद्री | चौफेर न्यूज
मारेगाव : वडीलांकडे राहत असलेल्या विवाहित महिलेने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज दि.७ जून रोजी सकाळी जवळपास ७ वाजताच्या सुमारास मार्डी येथील माहेरी उघडकीस आली.
रोशनी आशिष झाडे वैद्य (२५) असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
या घटनेने मार्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करण्यात आल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
मृतक महिलेचा पती जितेंद्र झाडे रा. शेखापूर ता. हिंगणघाट याचा दोन महिन्यांपूर्वी निधन झाल्याने ती नैराश्येत होती. त्याच नैराश्यतून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा कयास आहे. विवाहितेने पोटच्या चिमुकलीस साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्येच्या प्रयत्नात नऊ वर्षीय बालिका सुदैवाने बचावली तर चोवीस वर्षीय आईचा करून अंत झाला.
या घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलिस करित आहे.
२५ वर्षीय विवाहित महिलेचा गळफास घेवून आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 07, 2022
Rating:
