चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
वणी : वणी ते नांदेपेरा हा रोड साधारणत: 10 टन वाहतुकीच्या क्षमतेचा आहे. त्यातही मजरा ते नांदेपेरा हा 3 कि.मी. रस्त्याची रुंदी फक्त 12 फुट असुन आज रोजी 8 ते 10 फुट रुंदीचा रस्ता अस्तीत्वात आहे.
वणी ते मजरा मार्गाचे रुंदीकरण झाले असले तरी रोडची क्षमता 10 टन वाहतुकीची असल्याने या रोडची मागील 6 ते 8 महीन्यापासुन जड वाहतुक सुरु असुन ती 20 ते 50 टनापयॆंत क्षमतेची असुन 16 ते 20 चाकी मोठे ट्रकनी कोळशाची व रेतीची वाहतुक सुरु आहे. त्यामुळे वणी ते नांदेपेरा या रोडवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असुन रोड पूर्णतः उखडला आहे.
बरेच अपघात व जिवहानी झालेली आहे. करीता येत्या 8 दिवसात हा रस्ता जड वाहतुकीस बंद करण्यात यावा. अन्यथा नांदेपेरावासी व आजुबाजुचे गावातील नागरिक "रास्ता रोको आंदोलन" करतील. अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी (SDO) वणी यांना देण्यात आले.
वणी ते नांदेपेरा रोड जड वाहतुकीस बंद करा; अन्यथा रास्ता रोको आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 24, 2022
Rating:
