एकाच व्यक्तीच्या हितासाठी नाही तर "परिवर्तन " फक्त संस्थेच्या हितासाठी - कपबशी

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : परिवर्तन पॅनल खोटी आश्वासन देवून एकाधिकार गाजवण्यासाठी नव्हे तर कर्जदारांना विशेष सुविधा, योजना परिसराच्या विकासासाठी अतिशय महत्वाची निवडणूक असून पतसंस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक ठेवण्यासाठी संस्थेत सुरु असलेला भ्रष्ट कारभार, एकाधिकारशाही दूर करण्यासाठी ही निवडणूक आहे. त्यासाठीच रिंगणात उतरली असल्याचे परिवर्तन पॅनल च्या निकटवर्तीयांनी सांगितले.
पतसंस्थेच्या निवडणुकीत "कपबशी" ला मतदारांचा कौल पसंती वाढत असल्याने विरोधकांना घरी बसण्याची वेळ मतदार आणणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चील्या जात आहे. एकाच व्यक्तीच्या हितासाठी नाही तर "परिवर्तन " फक्त संस्थेच्या हितासाठी आहे अशी नम्र आवाहन केले जात आहे. असे ब्रीद वाक्य प्रसिद्धी प्रचारातून समोर येत आहे.
तूर्तास रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेच्या निवडणुकीत मतदार राजा परिवर्तन घडवणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. होऊ घातलेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीत विरोधक वेगवेगळ्या आमिष दाखविणार असल्याचे खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. परंतु मतदार राजा समजूतदार आहे. बदल परिवर्तन करण्याचा आलस मनाशी धरून असल्याने ठरलं, म्हणत आपलं मत परिवर्तनाला असे बोलल्या जात आहे.
विशेष म्हणजे सभासदांचा कौल जत्था परिवर्तनाकडे वळल्याने पतसंस्थेची निवडणुक सत्ताधाऱ्यांना चांगलीच चुरशीची होणार आहे. "परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या उज्वल भविष्यासाठी परिवर्तन पॅनल ची गरज आहे ",असे परिवर्तन पॅनल मधील यंग डॅशिंग युवा नेते आशिषभाऊ खुलसंगे यांनी माध्यमातून सांगितले आहे.
एकाच व्यक्तीच्या हितासाठी नाही तर "परिवर्तन " फक्त संस्थेच्या हितासाठी - कपबशी  एकाच व्यक्तीच्या हितासाठी नाही तर "परिवर्तन " फक्त संस्थेच्या हितासाठी - कपबशी Reviewed by सह्याद्री चौफेर on June 24, 2022 Rating: 5
Powered by Blogger.