कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : दुपारी पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणचा विदयुत पुरवठा खंडीत झाला होता. अशातच गोकुळ नगर परिसराचाही विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने अर्बन -1 मधील कर्मचारी व सहाय्यक बाह्य स्रोत (OUT SOURCE) हे येथील खंडीत विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले, मात्र चुकून जिवंत तारेला स्पर्श झाल्याने आऊट सोर्स सहाय्यकाचा मृत्यू झाला. ही घटना 14 जून रोजी दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान घडली असल्याचे समजते.
रजत संजय अवचट (25) असे विजेचा शॉक लागून मृत पावलेल्या (बाह्य स्रोत) सहाय्यकाचे नाव आहे. तो रंगारीपुरा येथील निवासी आहे.
आज दुपारच्या सुमारास शहरात पावसाने हजेरी लावली असताना शहरातील काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या मध्ये गोकुळ नगर येथीलही विज पुरवठा खंडीत झाल्याने स्थानिकांनी महावितरणच्या अर्बन -1 ला अवगत केले. पाऊस थांबताच महावितरण कर्मचारी व त्यांच्या सहाय्यक असलेला रजत अवचट हा गोकुळ नगर परिसरात गेला होता.
या परिसरालगतच ११ केव्ही (KW) चे पॉवर हाऊस आहे. खंडीत विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येत असताना चुकीने ११ केव्ही (KW) च्या जिवंत तारेला हात लागल्याने तो खाली कोसळला. तातडीने उपस्थित कर्मचाऱ्यांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असता, तपासाअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विशेष उल्लेखनीय की, रजत च्या वडिलांचा सहा वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाल्याने तो आई सोबत राहत होता. तो घरात कमावता होता, त्याच्या अशा अकाली जाण्याने आईचा धिर खचला आहे. परिणामी अवचट कुटुंबियांना महावितरण कंपनीकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आहे. तसेच यापुढे अशा घटना घडणार नाही याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे अन्यथा अशा घटना वारंवार घडतील.
महावितरणच्या सहाय्यकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 14, 2022
Rating:
