चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
वणी : सुनिताताई मधवरावजी पोयाम ह्या समाजीक चळवळीच्या खंद्या सहानुभूतिदार होत्या, त्या सामाजिक चळवळीच्या पाठीसी तन, मन, धनानी उभ्या राहून चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्यांना काम करण्यास प्रोत्साहित करीत असे, त्यामुळे आपण चळवळीच्या एक खंद्या सहानुभूतिदार आज गमविल्या आहे असे, उद्गगार या निमीत्याने आयोजीत शोक सभेचे अध्यक्षस्थानावरुन बोलत असतांना प्रगतिशील साहित्यिक व विचारवंत गीत घोष यांनी काढले आहे.
रविवार दि. १२ जून २०२२ च्या रात्री १२ वाजताच्या दरम्यान निसर्गविलीन सुनिताताई यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यात त्यांचा मृत्यु होऊन निसर्ग विलीन झाल्यात.
त्यांचा अंतिम संस्कार सोमवार दि.१३ जून २०२२ ला करण्यात आला. त्यांना श्रध्दांजली देण्यासाठी मोक्षधाम येथील सभागृहात एका श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
त्या श्रध्दांजली सभेच्या अध्यक्षस्थानी मा. गीत घोष हे होते तर, प्रमुख अतिथी म्हणून माजी गटविकास अधिकारी रामदासजी गेडाम, निळकंठजी जुमनाके सर, माजी मुख्याध्यापक सुभाष आडे हे होते. पुढे बोलतांना घोष म्हणाले की, स्वर्ग नर्क ही संकल्पना आदिवासी संस्कृतीच्या नीती मुल्यात बसत नसून आदिवासी हे निसर्गवादी आहेत त्यामुळे आदिवासी आत्मा, परमात्मा व ईश्वर या थोतांडाला बळी पडू नये. या प्रसंगी प्रमूख अतिथींनी देखिल आपल्या शोकसंवेदना अर्पित केल्या.
या प्रसंगी शहरातील व शहरा बाहेरील चळवळीतील कार्यकर्तागण तथा आप्त जन त्यांच्या अंतीम संस्काराला मोठ्या संकेत उपस्थित होते.
आपण चळवळीच्या एक खंद्या सहानुभूतिदार सुनिताताई पोयम यांना गमावून बसलो आहे - गीत घोष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 14, 2022
Rating:
