चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आकाश नेहमी प्रमाणे वणीला कामाला जायचा,रॊज नऊ वाजता घरी परत यायचा. मात्र, 12 जून ला तो 1 वाजता कामावर गेला. तो घरी परत आलाच नाही म्हणून त्याच्या आईने नातेवाईकांना रात्रभर संपर्क साधून त्यांची विचारपूस केली, मित्राकडेही विचारणा केली. त्याची दुचाकी भीमनगर येथील मिस्त्री दिनेश ठाकरे यांचे घरी ठेवून असल्याचे माहिती मिळाली. तिथे तो काम करतो त्यांच्या घरी जावून त्याच्या आईने चौकशी केली. परंतु आकाश चा कुठेही पत्ता लागला नाही.
अखेर त्याची आई, श्रीमती दिना विजय धवणे (35) रा. वनोजा ता. मारेगाव ह्यांनी आकाश बेपत्ता झाला
असून, याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात दि.14 जून रोजी तक्रार दाखल झाली आहे. रंग काळसावळा, सडपातळ बांधा, उंची 5.6 इंच, अंगात निळ्या रंगाचा जीन्स व कथ्या रंगाचे टी शर्ट असे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
वनोजा येथील 21 वर्षीय गवंडी बेपत्ता; वणी पोलिसात तक्रार दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 14, 2022
Rating:
