योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी : आज दुपारी झरी जामणी तालुक्यातील काही भागामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. मुदाठी व रजणी येथील दोघांवर विज कोसळून जागीच मृत्यू झाला आहे.
गजानन पोचीराम टेकाम रा. मुदाठी असे विज पडून मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे. गजानन यांचे वर वीज पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाला आहे व त्यांच्या सोबत असलेले मारोती सुर्यभान टेकाम हे किरकोळ जखमी झाले आहेत. हे दोघे आपल्या शेतामध्ये पेरणी करिता सारे फाडत असतांना १२:३० वाजता सुमारास पाऊस मेघगर्जनेसह चालू झाल्याने दोघाने एका मोहाच्या झाडा चा आश्रय घेतला. मात्र विजेचा कडकडाट सुरु झाला आणि अंदाजे दीड वाजता सुमारास दोघांवर अचानक वीज कोसळली. यात गजानन पोचिराम टेकाम (४०) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर मारोती टेकाम किरकोळ जखमी झाल्याचे समजते. मृतक गजानन यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं असा आप्त परिवार आहे आहे.
याच दरम्यान, राजनी येथील निबेश कडू आत्राम (३०) वर्षाचे शेतकरी आपल्या शेतात सारणी करित असताना पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. त्यामुळे निबेश हा पावसापासून बचावाकरिता निंबाच्या झाडाखाली थांबला. अशातच आकाशात विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली, त्यात त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पाठीमागे पत्नी, ७ वर्षाचा मुलगा व ५ वर्षाची मुलगी आहे.
कुटुंबातील आधारवड हरवल्याने त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.
विज पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू ; एक जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 15, 2022
Rating:
