टॉप बातम्या

क्रिश विजय येरणे 93.40 टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच लागलेल्या दहावी परीक्षेत उतुंग यश मिळवले.

क्रिश विजय येरणे हा 93.40 टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम आला तर कु वैभवी विजय महाकुलकर 90.60 टक्के गुण मिळवून दुसरी आली. कु प्राची योगेश्वर ताजने 90.60 टक्के गुण मिळवले, आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थी गुरुजनांना व आई वडिलांना देतात.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री नरेंद्रजी नगरवाला, उपाध्यक्ष मा. श्री रमेशजी बोहरा, सचिव मा. श्री लक्ष्मणजी भेदी, सहसचिव मा श्री अशोकजी सोनटक्के (उत्तीर्ण विद्यार्थी क्रिश येरणे चे अभिनंदन करताना शिक्षक वृंद )

तसेच मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मा श्री प्रमोद क्षीरसागर सर, उपमुख्याध्यापक मा श्री रमेश तामगाडगे सर, मा श्री शोभने सर, मा श्री लांडे सर, मा श्री गोहकार सर, देवाळकर सर, देशमुख मॅडम,बडे मॅडम, खैरे मॅडम, सिंग मॅडम तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Previous Post Next Post