टॉप बातम्या

आदिवासी कोलाम महोत्सव २०२२ बक्षीस वितरण सोहळा संपन्न


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 
 
मारेगाव : आदिवासी कोलाम बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा च्या वतीने आयोजित केलेल्या
आदिवासी कोलाम महोत्सव 2022 ची यशस्वी सांगता
रविवार (ता.19 जुन) माऊली लॉन पांढरकवडा येथे बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला.

18 व 19 जून दरम्यान जल्लोषात झालेल्या गावबांधणी (साथी), क्रीडा, वेशभूषा विविध स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना आकर्षक स्मृतिचिन्ह, प्रशिस्तपत्रके, रोख रक्कम, देऊन गौरवण्यात आले.
युवक वर्गापासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्पर्धकांनी ही स्पर्धा गाजवली. या कोलाम महोत्सव स्पर्धेला स्पर्धक महाराष्ट्रातून चंद्रपूर, नांदेड, वर्धा, यवतमाळ, येथील कोलाम बांधव बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली.

या कोलाम महोत्सव 2022 सोहळ्याचे एक विशेष आकर्षण ठरले. यामध्ये सांस्कृतिक समुह स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी मेंढणी तालुका मारेगांव या गावाला मिळाला.
तर वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मारेगांव येथून पोतु आत्राम यांनी बहुमान मिळवला आहे.
क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी प्रथम क्रमांक - गवराई तालुका केळापूर, द्वितीय क्रमांक- कापरा किटा यवतमाळ,
तृतीय क्रमांक गोघुलदरा तालुका मारेगाव यांनी मिळवला. या कोलाम सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पांढरकवडा येथे झाले. या प्रसंगी बोलताना आदिवासी कोलाम समाजाने शिक्षणाकडे गांभीर्याने बघणे गरजेचे असून पुढील पिढीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षित करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले. 
या 2022 कोलाम महोत्सव कार्यक्रमाला शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी, माजी मंत्री वसंतराव पुरके, अप्पर आयुक्त अमरावती, यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन, क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल आत्राम यांनी विशेष सोहळ्यात हजेरी लावून कोलाम बांधवाचे विशेष कौतुक केले.
या कोलाम महोत्सवाला यशस्वीरित्या करण्यासाठी 
ग्रामसाथी, क्षेत्र समन्वयक प्रकल्प समन्वयक आश्रम शाळेतील शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले.
         जाहिरातसाठी संपर्क करा : 9011152179
Previous Post Next Post