सह्याद्री | चौफेर न्यूज
वणी : येत्या 26 जून ला श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक आहे. या संस्थेचे अध्यक्ष अॅड देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल उभं असून त्यांचे बोध चिन्ह "छत्री" आहे.
गेल्या विष वर्षात पतसंस्थेने सहकार क्षेत्रात जी यशस्वी झेप घेतली, याचं संपूर्ण श्रेय जातं ते या पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांनाच. उत्तम नियोजन, कामकाजात सूत्रबद्धता व त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे ही पतसंस्था सहकार क्षेत्रात यशोशिखर गाठलं आहे. अॅड. देविदास काळे यांची पतसंस्थे ला आवश्यकता आहे. असे जनमाणसातून बोलल्या जात आहे. त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने पतसंस्थेचा सांभाळ केला व पतसंस्थेची उलाढाल कोट्यवधींच्या घरात नेली, त्यावर दुसरा कुणी पाणी फेरू नये म्हणून अॅड. काळे यांच्या अनुभवी हातातच पतसंस्थेची धुरा असणं गरजेचे आहे.
अॅड. देविदास काळे समर्थित जय सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी ही निवडणूक होणार आहे. मात्र, अॅड. काळे यांची यशस्वी कारकीर्द बघता मतदारांचा कौल अॅड. देविदास काळे यांच्या जय सहकार पॅनल ला मिळेल यात शंका नाही.
माध्यमाशी बोलताना काळे म्हणाले की, जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ दिलेला नाही. मी एका राजकीय पक्षात आहे. यात राजकारण घालू नये, मुळात एकाच गटात लढत होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, ते होऊ शकले नाही. एका वाक्यात सांगायचं म्हटले तर "आम्ही बोलत नाही संस्थेचा विकास बोलतो" हे ब्रीद वाक्य घेवून एका दहा बाय दहा च्या छोटाश्या खोलीत सुरुवात करून संस्था उदयास आणली आणि गेल्या अनेक वर्षपासून संस्था प्रगतीपथावर आहे.
अॅड देविदास काळे समर्थित जय सहकार पॅनल या निवडणुकीत उभं आहे. मतदारांनी माझ्या कामाची जाणीव ठेऊन येत्या 26 जूनला मतदान करतांना "छत्री" या बोध चिन्हा समोर रबरी फुलीचा शिक्का मारून जय सहकार पॅनल च्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन पॅनलच्या वतीने करण्यात येत आहे.