टॉप बातम्या

विदर्भातून हजारो ओबीसी बांधव महाअधिवेशनाला जाणार : ओबीसी नेते डॉ अशोक जिवतोडे


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर  

चंद्रपूर : विदर्भातील विविध जिल्ह्यामधून हजारोच्या संख्येने ओबीसी (OBC) बांधव दिल्ली येथील ओबीसी महाअधिवेशनाला जाणार असल्याचे नियोजन आज (ता.19 जून ) रोजी झालेल्या बैठकीच्या माध्यमातून ओबीसी नेते डॉ अशोक जिवतोडे यांनी सांगितले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे 7 वे महाअधिवेशन 7 ऑगस्ट 2022 ला नवी दिल्ली (New Delhi) येथील तालकटोरा इंडोर स्टेडियम येथे आयोजित केले आहे. या महाअधिवेशनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने सर्व विंगच्या पदाधिकाऱ्यांनी सहविचार सभा घेण्यात आली. या अधिवेशनाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षतेखाली व समन्वयक डॉ अशोक जिवतोडे यांचे उपस्थितीत बैठकीचे आयोजन आज दुपारी 1 वाजता श्री लीला सभागृह, जनता शिक्षण महाविद्यालय येथे करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, उपाध्यक्ष डॉ सुधाकर जाधव, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रदीप वादाफळे, युवा अध्यक्ष सुभाष घाटे, सहसचिव शरद वानखेडे, कर्मचारी संघटनेचे शाम लेडे, गुणेश्वर आरीकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भगीरथ, युवा अध्यक्ष चेतन शिंदे, मनोज चव्हाण, महिला महासंघाचे सुषमा भड, रेखा बाराहाते, कल्पना मानकर, कर्मचारी महिला महासंघाच्या रजनी मोरे, विद्यार्थी संघटनेचे रोशन कुंभलकर, आदी उपस्थित होते.
डॉ बबन तायवाडे यांनी ओबीसी (OBC) समाजाची दशा आणि दिशा यावर यथोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सचिन राजूरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा रविकांत वरारकार तर आभार प्रदर्शन रजनी मोरे यांनी केले. यावेळी विदर्भातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव बैठकीला उपस्थित होते. 
सह्याद्री चौफेर वर जाहिरातकरिता संपर्क : 9011152179
सह्याद्री चौफेर वर जाहिरातकरिता संपर्क : 9011152179
Previous Post Next Post