टॉप बातम्या

घुग्गुस : लोयड्स मेटल्स कंपनी परिसरातील पावर स्टेशनला आग

सह्याद्री | चौफेर न्यूज 

चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घूस येथील लॉयडस मेटल्स कंपनीतीच्या पॉवर प्लांट मधील सब स्टेशनला (ता.18 जून) रोजी सांयकाळी 6:30 वाजताच्या सुमारास आग लागली. आग इतकी भीषण होती की, सर्वत्र आगीचा धुरच धूर पसरला होता. या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
सदर आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. मात्र, ही आग कशाने लागली याचे कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे.
परंतु आग विझिण्याचे कार्य युद्ध पातळीवर कार्य सुरु असून अचानक स्फोट झाल्याने कंपनी परिसर हादरून गेला. दरम्यान, संबंधित विभाग घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते. 
Previous Post Next Post