टॉप बातम्या

प्रहार विध्यार्थी आघाडी चे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार, व प्रहार जनशक्ती पक्षात युवकांचा पक्ष प्रवेश संपन्न


नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

उमरखेड : आज प्रहार जनशक्ती पक्ष उमरखेड शहर व तालुक्याच्या वतीने शासकीय विश्राम गृह उमरखेड येथे नवनिर्वाचित प्रहार विध्यार्थी आघाडी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता तसेच या कार्यक्रमात बच्चूभाऊ कडु यांच्या विचारांवर प्रेरित होऊन तालुक्यातील युवकांनी आज पक्ष प्रवेश केला.

या कार्यक्रमात सत्कारमूर्ती नवनिर्वाचित पदाधिकारी आकाश शिंदे यांची प्रहार विध्यार्थी संघटना उपजिल्हा प्रमुख पदी तर प्रहार विध्यार्थी संघटना तालुका संघटक पदी शिवाजी हुडे यांची तर प्रहार विध्यार्थी संघटना शहराध्यक्ष पदी सावन हिंगमीरे यांची निवड झाल्याबद्दल आज यांच्या सत्कार प्रहार जनशक्ती पक्ष उमरखेड शहर व तालुक्याच्या वतीने विश्राम गृह उमरखेड येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष गोपाल भाऊ झाडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका अध्यक्ष सय्यद माजिद सय्यद पाशा, शहराध्यक्ष राहुल मोहितवार, मजहर पठाण, गजानन धोंगडे, विवेक जळके होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अंकुश पाणपट्टे प्रहार जनशक्ती पक्ष तालुका संपर्क प्रमुख यांनी केले.

या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करतांना तालुका प्रमुख सय्यद मजीद यांनी पक्ष्याच्या ध्येय धोरण यावेळी समजावून सांगितले, तर शहराध्यक्ष राहुल मोहितवार यांनी विध्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय, शिक्षण व्यवस्था आज कश्या पद्धतीने गोर गरिबांवर अन्याय करत आहे, पालकांना आपल्या मुलाचे शाळेत ऍडमिशन करत असताना काय त्रास होतो यावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तसेच विवेक जळके यांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी मागील काळात विध्यार्थी आघाडी मध्ये काम केले. त्यावेळेस त्यांच्या सोबत घडलेले अनुभव त्यांनी सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात गोपाल भाऊ झाडे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी विध्यार्थी आघाडी उपजिल्हा प्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी मागील ६ वर्षांपासून काम करत असतांना त्यांच्या सोबत घडलेले प्रसंग व त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून पक्षाने दखल घेत माझी निवड उपजिल्हा प्रमुख पदी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या आयोजित कार्यक्रमात दोन युवकांनी पक्ष प्रवेश करत प्रहार परिवारात सामील झाले त्यात लिमगाव येथील नरेंद्र काळे तर उमरखेड शहरातील अफरोज खान यांनी बच्चूभाऊ च्या विचारावर प्रेरित होत व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या कार्यावर प्रेरित होऊन आज पक्ष प्रवेश केला.

यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख सय्यद माजिद सय्यद पाशा, तालुका संपर्क प्रमुख अंकुश पाणपट्टे, शहर प्रमुख राहुल मोहितवार, ता. उपप्रमुख गोपाल भाऊ झाडे, मजहर पठाण, ता. प्रसिद्धी प्रमुख विवेक जळके, ता. उप संघटक, गजानन धोंगडे, बाळदी शाखा प्रमुख प्रवीण इंगळे, जयकीसन पुरी, सुनील खोलगडे, प्रहार विध्यार्थी आघाडी उपजिल्हा प्रमुख आकाश शिंदे, ता. संघटक वि. आघाडी. शिवाजी हुडे, शहराध्यक्ष वि. आघाडी सावन हिंगमीरे, नरेंद्र काळे, अफरोज खान, व आदी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post