सह्याद्री | चौफेर न्यूज
सध्या मान्सूनचा कालावधी सुरू असून दरवर्षी मान्सून व मान्सूमपूर्व काळात आकाशात वीजेचा गडगडाट होवून विजा पडण्याचे प्रमाण जास्त असते. विज पडून मोठया प्रमाणात जीवीतहानी होवून अनेक शेतकरी, सामान्य नागरिक याला बळी पडतात. वीज पडून जीवीत हानी होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय, भारत सरकार दिल्ली यांनी दामिनी ॲप तयार केले आहे. दामिनी ॲप वीज पडण्याची पूर्व सूचना देते. शेतकरी व नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचविण्यासाठी या ॲपचा अवश्य वापर करावा. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवाना वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनीट अगोदर हे वीज पडण्याचे संकेत तसेच विजांच्या गडगडाटाबरोबरच त्याचा वेग किती आहे हे सुध्दा ॲपवर कळते. दामिनी ॲपच्या माध्यमातून याचा अंदाज वर्तविला जात असून अशा परिस्थितीत लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. म्हणजे सावध राहून जीवित व वित्तहानी वेळीच टाळता येते.
मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडून जीवीत हानी होते. जीवीतहानी होवू नये यासाठी नागरिकांनी व विशेषत: शेतकऱ्यांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी दामिनी ॲप अवश्य वापरावे. दामिनी ॲप शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे.
- अलका पाटील,
माहिती सहाय्यक,
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड