सह्याद्री | चौफेर न्यूज
वणी : रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेच्या निवडणूकीचे वारे वाहू लागल्याने अनेकांच्या नजारा या निवडणूकीकडे फिरावल्या असून चक्क! पावसाळ्यात घाम सोडणारी निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जात आहे.
जय सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल असे घमासान "धुरळा" उडणार आहे. येत्या 26 जून रोजी होऊ घातलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असून,सत्ता मिळविण्यासाठी सहकार पुन्हा आपली शक्ती सर्वतोपरी पणाला लावली आहे. परंतु मतदार राजा परिवर्तनाच्या वाटेवर असल्याचे चर्चील्या जात असतांना पतसंस्थेतील सत्ताधाऱ्यांना घरी बसण्याची वेळ मतदार आणणार असल्याचे राजकीय वर्तुळातुन बोलले जात आहे.
सहकार विरुद्ध परिवर्तन अशी चूरशीची लढाई होणार आहे. निवणुकीत, या अनुषंगाने सत्ताधारी मतदारांना वेगवेगळे आमिष दाखवतील. मात्र परिवर्तनवादी मतदाता या अमिषाला बळी पडणार नाहीत,अशी विरोधकांतून चर्चा आहे. तूर्तास सभासदांच्या मनात सभासदांच्या मतात ही "कपबशी" आहे. शिवाय एकाच गोठ्यातून दोन बाहुबली उभे,
त्यामुळे पतसंस्थेची निवडणूक आता "काटे की टक्कर" होणार आहे यात शंका च नाहीये.
येत्या 26 जून ला "कप बशी" या बोध चिन्हा वर फुलीचा शिक्का मारून सर्व उमेदवारांना निवडून द्या! असे आवाहन परिवर्तन पॅनलकडून मतदारांना करण्यात येत आहे.