कळंब पंचायत समिती कार्यालयात जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय माहिती अधिकारी यांचे नावाचे फलक लावण्यात यावे
सह्याद्री | चौफेर न्यूज
कळंब : केन्द्रीय माहिती अधिकार 200५ अंतर्गत प्रत्येक शासकीय, निमशासकीय तसेच सार्वजनिक प्राधिकरण कार्यालयाच्या दर्शनी भागावर जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय माहिती अधिकारी यांच्या नावाचे फलक लावणे कार्यालय प्रमुखाला बंधनकारक आहे. परंतु कळंब पंचायत समिती कार्यालयात अजून पर्यंत कार्यालयाच्या दर्शनी भागावर जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय माहिती अधिकारी यांच्या नावाचे फलक लावण्यात आले नाही. त्यामुळे केंद्रीय माहिती अधिकार कायदयाची पायमल्ली होत आहे. केंद्रीय माहितीचा अधिकार कायदयाच्या प्रभाविपणे अमलबजावणी होण्याच्या दृष्टीने जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय माहिती अधिकारी यांचे पदनिर्देशीत करून कार्यालयाच्या दर्शनी भागावर त्यांच्या नावाचे फलक लावावे अशी मागणी राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाच्या वतीने मे गटविकास अधिकारी पंचायत समिती कळंब यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख यांनी दिली आहे.
निवेदन देते वेळी प्रतिनिधी अनुप साळवे, रूस्तम शेख इ कार्यकर्ते उपस्थित होते.
कळंब पंचायत समिती कार्यालयात जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय माहिती अधिकारी यांचे नावाचे फलक लावण्यात यावे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 12, 2022
Rating:
