विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : मारेगाव सारख्या ग्रामीण भागातील असलेले कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हे ज्ञानदाणाचे कार्यात अग्रेसर राहिलेले आहे. दि.१० मे २०२२ रोजीला महाविद्यालयात बिए,बि कॉम व बि एससी मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित केला होता. सदर सोहळ्यामध्ये तीनही शाखेच्या मिळून २३३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा जीवन पाटील कापसे उपस्थित होते. मानवी जीवनात संघर्षातूनच परिवर्तन घडवून आणले जाते मत त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. मा शशिकांत आस्वले सरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. वर्तमान काळातील आपले प्रयत्न हेच आपणास जागतिक महासत्ता बनवेल असे असे विचार त्यांनी व्यासपीठावरून व्यक्त केले. याच बरोबर त्यांनी प्राचीन काळातील भारतातील वैज्ञानिक व प्रगतीचा इतिहास सुद्धा आपल्या भाषणातून सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ गजानन सोडनर व डॉ विनोद चव्हाण यांनी केले. डॉ आस्वले सरांचा परिचय प्रा शैलेश सरांनी केला तर प्रा अक्षय जेणेकर यांनी सर्वांचे आभार मानले. डॉ संदीप केलोडे, डॉ विभा घोडखांदे, प्रा बाळासाहेब देशमूख, डॉ प्रवीण कुलकर्णी, प्रा राजश्री गडपायले, डॉ मंजू परदेशी, डॉ अनिल अडसरे, प्रा शैलेश आत्राम, प्रा रुपेश वांढरे, डॉ नितीन राऊत, प्रा स्नेहल भादककर, डॉ मीनाक्षी कांबळे, श्री दीपक मनवर, श्री रवि परचाके, श्री आकाश कुमरे व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मोलाचे प्रयत्न केले.
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 11, 2022
Rating:
