कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : वणी येथे 15 में रोजी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, टागोर चौक येथे सकाळी 9: 30 वाजता प्रा.सुरेश चोपणे (अध्यक्ष-ग्रीन प्लानेट सोसायटी, सदस्य-केंन्द्रीय वने,पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, दिल्ली) व मा. श्री. राजु भाऊ पिंपळकर यांचे पर्यावरण, हवामान बदलाचे धोके आणि आपली भूमिका या विषयावर व्याख्यान होणार आहेत. स्माईल फाउंडेशन च्या वतीने पर्यावरण कार्यशाळेचे हे आयोजन आहेत.
यावेळी तसेच वणीतील पर्यावरणप्रेमींनी व लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी सर्वांना केले आहे.
वणी येथे प्रा.सुरेश चोपणे यांचे जाहीर व्याख्यान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 13, 2022
Rating:
