लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी



विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : पहापळ येथील अवघ्या सहा वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिला काटेरी झूडपात फेकून दिले व नराधम फरार झाला होता,त्याला आज पांढरकवडा कोर्टाने तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मारोती मधुकर भेंडाळे (33) रा. पहापळ असे पीडितेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे.

मारेगाव तालुक्यातील पहापळ गावातील सदर घटना ही दि. ९ मे रोजी सायंकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान घडली. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार पीडित मुलगी आजी सोबत शौचास गेली असताना मारोतीने तिला शेतशिवारात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची पीडित मुलीच्या वडिलांनी मारेगाव पोलिस ठाण्यात मारोती विरोधात फिर्याद दाखल केली. जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ व वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाचे पोलिस निरिक्षक राजेश पुरी, सहाय्यक पोलिस निरिक्षक सांवत, वणीच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक माया चाटे, पोलिस जमादार चंद्रकांत पाटील, राजु टेकाम, अजय वाभिटकर यांनी या घटनेचा तपास केला. आरोपीला वडकीतून मोठ्या शिताफीने ताब्यात घेत अटक केली.
आरोपी मारोती याला आज गुरूवार (ता.१२) मे ला पांढरकवडा कोर्टात हजर केले असता त्याला तिन (15 मे) दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीवर यवतमाळ येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या किळसवाण्या घटनेने मारेगाव तालुका हादरला असून नराधमाला फाशी च्या शिक्षेची मागणी विविध स्तरावरून होत आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी Reviewed by सह्याद्री चौफेर on May 12, 2022 Rating: 5
Powered by Blogger.